महाराष्ट्रात एआय क्रांतीची नांदी
मुंबई, पुणे व नागपूर येथे उभारले जाणार ‘कौशल्य व उत्कृष्टता केंद्र’
महाराष्ट्रातील पहिले एआय विद्यापीठ कोणते आहे?
date 17/04/2025
महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यात नुकत्याच झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये AI कौशल्य व उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे . ही केंद्रे राज्याच्या डिजिटल परिवर्तनात निर्णायक भूमिका बजावणार आहेत.या भागीदारीतून प्रशासनात आमूलाग्र बदल घडवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मुंबईमध्ये भौगोलिक विश्लेषणासाठी अत्याधुनिक AI केंद्र, पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानासाठी पायाभूत सुविधा, तर नागपूरमध्ये प्रगत संशोधन व MARVEL अंमलबजावणी तंत्रज्ञानासाठी विशेष केंद्र स्थापन केले जाणार आहेत . उपक्रमाचा मूळ हेतू म्हणजे सार्वजनिक सेवा वितरण अधिक कार्यक्षम, गतिमान व नागरिक-केंद्रित करणे. यासाठी AI, हायब्रिड क्लाऊड, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा व ऑटोमेशनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर केला जाणार आहे. व्हर्च्युअल सहाय्यक आणि एजेन्टिक AI च्या साहाय्याने शासन सेवा अधिक वैयक्तिक, सुलभ व परिणामकारक होतील. विशेष म्हणजे, या AI मॉडेल्सवरील मालकी हक्क पूर्णतः महाराष्ट्र शासनाकडे राहतील.जनरेटिव्ह AI च्या साहाय्याने प्रशासकीय प्रक्रिया अधिक अंदाजाधारित, पारदर्शक व स्मार्ट बनवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, हायब्रिड क्लाऊड, ओळख व्यवस्थापन प्रणाली व सुरक्षित नागरिक प्रवेश या तंत्रज्ञानावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. या केंद्रांच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना AI, सायबर सुरक्षा व क्लाऊड तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण IBM च्या अत्याधुनिक प्लॅटफॉर्मवरून दिले जाईल. याशिवाय, MSME आणि उद्योग क्षेत्राला AI व ऑटोमेशन स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
सरकारमध्ये AI चे पूर्ण रूप काय आहे?
एआय चांगला आहे की वाईट?
महाराष्ट्रात एआय इंजिनिअरिंगसाठी कोणते कॉलेज सर्वोत्तम आहे?