उष्णतेचं सावट म्हणजे मानवी अस्तित्वाची लढाई

 उष्णतेचं सावट : मानवी अस्तित्वाची लढाई

Maharashtra Weather Update


      date - 3/5/2025

      उन्हाळा प्रत्येक वर्षी येतो, पण यंदाचा उन्हाळा काहीसा वेगळा आहे — अधिक तापदायक, अधिक असह्य, आणि अधिक धोकादायक. २०२५ च्या उन्हाळ्यात भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांसाठी येलो अलर्ट जारी केला. एप्रिल-मे महिन्यात दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ आणि केरळमधील अनेक जिल्ह्यांत तापमान ४४°C च्या वर पोहोचलं. हे फक्त तापमान नव्हे, तर एका असह्य वास्तवाची चाहूल आहे.

         काही वर्षांत जगभरात तापमान झपाट्याने वाढलं आहे. २०२४ हे पृथ्वीवरचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलं. NASA व NOAA च्या अहवालांनुसार प्राचीन औद्योगिक काळाच्या तुलनेत तापमान जवळपास १.५°C ने वाढलं आहे. भारतात १९०१ पासून आजपर्यंत सरासरी तापमानात ०.७°C ची वाढ झाली आहे. ही वाढ काही आकडेवारीपुरती मर्यादित नाही — तिचे परिणाम आपल्याला दररोज जाणवत आहेत.

मागील पाच वर्षांत उष्णतेमुळे भारतात शेकडो लोकांचे प्राण गेले, गहू व तांदळासारख्या पीकांचे मोठे नुकसान झाले आणि पाण्याचा तुटवडा वाढला. २०२२ मध्येच ९० हून अधिक मृत्यू आणि ३५% पर्यंत पीक नुकसान नोंदवण्यात आलं. २०२३ व २०२४ मध्ये युरोप, अमेरिका, आणि आफ्रिकेतही उष्णतेने कहर केला — हजारो लोक मृत्युमुखी पडले.   


मानवी अस्तित्वाची लढाई

२०२५ साठी हवामान संशोधन गंभीर इशारे देतंय. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण विक्रमी पातळीवर आहे आणि हवामान अधिकच अस्थिर होणार आहे. जास्तीत जास्त भागांत दुष्काळ, वणवे, पूर आणि अत्याधिक उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. हे केवळ हवामानशास्त्र नव्हे — ही मानवी अस्तित्वाची लढाई आहे.

आपण अजूनही वेळेत आहोत. आपल्या सवयी बदलून, ऊर्जा वापर कमी करून आणि पर्यावरणपूरक पर्याय निवडून आपण हे संकट टाळू शकतो.

जागे व्हा. उष्णता आता थांबवायला हवी.

कारण, उद्याचं भविष्य आजच्या कृतीवर अवलंबून आहे.

यलो अलर्ट म्हणजे काय?

हवामानात ग्रीन अलर्टचा अर्थ काय हवामानात रेड झोन म्हणजे काय?

ग्रीन झोन आणि यलो झोन म्हणजे काय?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.