शिर्डी येताना घ्या ही काळजी

 शिर्डी येताना घ्या ही काळजी 29/4/2025 


                       AI imege

सध्या येणार काळ हा सुट्टीचा आहे त्यामुळे प्रत्येक जण  फिरण्याचा बेत  नक्की करण्याचा प्रयत्न करणार . प्रवासाच्या नियोजनाची आखणी करताना बकेट लिस्ट मध्ये शिर्डी हे ठिकाण नक्की असतं . शिर्डी या ठिकाणी साईबाबांच्या   दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येतात. जर या उन्हाळ्याच्या सुट्टीत शिर्डी येण्याच्या विचारात अ तर खालील काही बाबी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरती

  शिर्डी या ठिकाणी थेट रेल्वे,बस,आणि विमान या तीनही मार्गे येता येते. रेल्वेने येण्याचा विचार जर असेल तर सर्वात जास्त रेल्वे गाड्यांची उपलब्धता कोपरगाव या जवळील स्थानकावर आहे. कोपरगावपासून शिर्डी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर खाजगी वाहने सहज उपलब्ध असतात . 

पैसे वाचवणारी टीप 

कोपरगाव रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर तेथून रिक्षाने केवळ 20 रुपयांत बस स्थानकावर यावे . त्याठिकणाहून अहिल्यानगर मार्गे  जाणारी बस ही केवळ 30 ते 40 रुपयांत आपणास साईनगरीत पोहचवेल . त्याठिकाणी मुख्य प्रवेश दारातून पोहचल्यावर आपली पादत्राणे (चप्पल/बूट)  व आपला मोबाइल काढून ठेवण्यासाठी मोफत लॉकर उपलब्ध आहेत . त्या ठिकाणी काही खाजगी लॉकरही उपलब्ध आहेत . त्यांचा दर 50 ते 100 रुपये आहे. काही फूल आणि प्रसाद विक्रेते त्यांच्याकडून खरेदी केल्याने मोफत त्यांच्या कडील लॉकरही उपलब्ध करून देतात. 


       शिर्डी या ठिकाणी देवस्थानातर्फे भोजनसाठी प्रसादालयात मोफत सुविधा उपलब्ध आहे. प्रसादालय ते मंदिर यातील अंतर पायी जाण्यासाठी केवळ 15  मिनिटाचे आहे.

शिर्डी या ठिकाणी निवासासाठी भक्ति निवास असून त्या ठिकाणी उत्तम दर्जाची सुविधा उपलब्ध आहे . 

           शिर्डी दर्शनानंतर जवळील शनिशिंगणापुर या ठिकाणी भेट देऊ शकता . तसेच नासिक याठिकाणी पंचवटी जवळील त्र्यंबकेशवर दर्शनाला जाऊ शकता .    

शिर्डी ते पुणे टॅक्सीचा खर्च किती आहे?औरंगाबाद ते शिर्डी अंतर औरंगाबाद ते शिर्डी बस वेळापत्रक What is the bus ticket price from Aurangabad to Shirdi? What is the bus ticket price from Shirdi Temple to Shani Shingnapur? What is the ticket price of Vande Bharat to Shirdi?    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.