महाराष्ट्रात
20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा
निवडणुका
*23 नोव्हेंबर रोजी
निवडणुकांचा निकाल लागणार
*उमेदवारी अर्ज भरण्याची
प्रक्रिया 22 ऑक्टोबर पासून सुरू होणार तर 29 ऑक्टोबर ही अर्ज
*4 ऑक्टोबर पर्यंत
उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल
*या निवडणुकांसोबत नांदेड
लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची ही घोषणा करण्यात आली
*288 मतदार संघात
निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे
*30 नोव्हेंबरला अर्जांची छाननी
होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत ही चार नोव्हेंबर पर्यंत असणार आहे.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल असं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार असून 288 मतदार संघात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे उमेदवारांना 22 ऑक्टोबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे तरी 29 ऑक्टोबर अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे.
30 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत ही चार नोव्हेंबर पर्यंत असणार आहे.
या निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा ही करण्यात आलेली असून विधानसभा निवडणुकांप्रमाणेच लोकसभा पोटनिवडणुकीचे वेळापत्रक सुद्धा राहणार आहे.