श्रीराम जन्मभूमी अयोध्येत साकार होणार महाराष्ट्र भवन | bhakt nivas
भक्त निवास अयोध्या
महाराष्ट्र भवन अयोध्येत उभारणार
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आयोध्येत महाराष्ट्र भवनाच्या भक्त निवासाची भूमिपूजन करण्यात आले.
भक्तनिवासाची इमारत सुमारे बारा मजली राहणार आहे.
या भक्त निवासाच्या इमारतीत ९५ व्हीआयपी चार व्हीव्हीआयपी व चार डॉरमेट्रिक हॉल यात बांधकाम होणार आहेत . या महाराष्ट्र भवनाच्या उभारणीसाठी उत्तर प्रदेश सरकारने अडीच एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना श्री. राम जन्मभूमी अयोध्येमध्ये भवन उभारण्याचं आवाहन केलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय घेतला. या महाराष्ट्र भवन च्या उभारणीसाठी जवळपास 250 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे आणि या भक्तनिवासाचं कार्य दोन वर्षात पूर्ण होईल अशी सध्या अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या भवनाच्या उभारणीनंतर महाराष्ट्रातून अयोध्येत जाणाऱ्या भक्तांसाठी एक उत्कृष्ट अशी सेवा सुविधा युक्त राहण्याची सोय होणार असून त्यामुळे भक्तांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे.
Search key ayodhya maharashtra bhavan contact number
Search key ayodhya maharashtra bhavan address