रूबिक्स क्यूब : ५० वर्षाचा अविस्मरणीय प्रवास|letest marathi update

 रूबिक्स क्यूब : ५० वर्षाचा अविस्मरणीय प्रवास  

रूबिक्स क्यूब : ५० वर्षाचा अविस्मरणीय प्रवास : 2024 पर्यंतचा 

एका हंगेरी नावाच्या शहरात एक शिल्पकार प्राध्यापक राहत होता .त्याच नाव एर्नो रुबिक होत . गणित शिकत असताना विद्यार्थ्याना त्रिमीतीय वस्तू समजाव्या म्हणून एर्नो रुबिकने लाकडाचा एक प्रोटोटाइप १९७४ ला तयार केला. या प्रोटोटाइपला मॅजिक क्यूब हे नाव देण्यात आले . एर्नो रुबिक याने १९७५ ला ‘कोडं’म्हणून त्याच पेटंट घेतलं. या मॅजिक क्यूबच्या उत्पादनाची जबाबदारी अमेरिकेतल्या ‘आयडियल टॉइज’ या कंपनीने घेतली. याच कंपनीने याला सर्वप्रथम रूबिक्स क्यूब अशी ओळख दिली. या रूबिक्स क्यूबवर सहा पृष्ठभागाच्या व सहा रंगाच्या ४.३×१०१९ रचना करणं शक्य आहे.  रूबिक्स क्यूबचा खेळ मेंदूचा व्यायाम घडवून आणणारा आहे .

             १९७४ पासून २०२४ पर्यंतच्या ५० वर्षाच्या प्रवासात लहान-मोठ्याना या रंजक खेळाने अक्षरशः वेड  लावले . १९८२ मध्ये जगातली पहिली रूबिक्स क्यूब वर्ल्ड चॅम्पियनशिप ही बुडापेस्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आली  होती. एर्नो रुबिक याने २०२० मध्ये रूबिक्स क्यूब बाबत त्याचा प्रवास व अनुभव यावर ‘क्यूब’ नावाचं पुस्तक प्रकाशित केलं . रूबिक्स क्यूबकहा हा मागील ५० वर्षाचा प्रवास अविस्मरणीय ठरला . या काळात ‘टॉय ऑफ द इयर’ चा पुरस्कार अनेक वेळ मिळवला . तसेच ‘बेस्ट सेलिंग टॉय ऑफ ऑल टाइम’ चा लौकिक कायम राहिला.

             एक पृष्ठभागावर एकच रंग असेल अशी रचना करण्याचा मोह पुढील १०० वर्षे तरी सर्व थोरामोठ्याना कायम राहील ,यात शंका नाही .


टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.