वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक कोण आहेत?लुई पाश्चर

 

वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक कोण आहेत?

लुई पाश्चर

  गोष्ट एका कॉलरा रोगावरच्या उपायाची 

  हा एक अपघाती शोध 

जन्म 27 डिसेंबर 1822 

मृत्यू - 28 सप्टेंबर 1895 

लुई पाश्चर यांनी पेशी सिद्धांतामध्ये कसे योगदान दिले?

लुई पाश्चर कोण आहे आणि त्याने काय शोधले?लुई पाश्चर हा सूक्ष्मजीवशास्त्राचा जनक आहे का?

               ही वेळ आहे 1880 सालाची त्यावेळी कोंबड्यांना कॉलर हा रोग खूप मोठ्या प्रमाणात होत होता. आणि या रोगामुळे अनेक कोंबड्यांचा संहार होत होता, त्यावर उपाय शोधण्याची गरज त्याकाळी अनेक वैज्ञानिकांमध्ये निर्माण झाली होती.  त्यामध्ये एक महान असे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक लुई पाश्चर हे सुद्धा या कॉलरा या रोगावर संशोधन करत होते.  त्यांनी कॉलराच्या जंतूची बरीचशी माहिती त्यांनी जमा केलेली होती .

लुई पाश्चर या शास्त्रज्ञाला आपण अष्टपैलू का म्हणतो?

 एकदा त्यांनी त्यावर योग्य तो उपाय करण्यासाठी आपले प्रयोग सुरू केले त्यांनी कोंबडीच्या मांसाचं सूप तयार करून त्यात हे जंतू वाढवले ते फार तीव्र परिणाम देणारे होते.  निरनिराळ्या भांड्यामध्ये ती वाढवले जात होती . असच एक दिवस त्यांच्या लक्षात आले कि बरेच दिवस बाजूला पडलेलं असं जंतू वाढवलेलं भांड  त्यांच्या  हाती आलं .  त्यातले  जंतू कोंबड्यांना टोचून पाहिले त्या कोंबड्यांना कॉलरा झाला पण तो अतिशय सौम्य स्वरूपाचा होता.  नंतर त्यांनी सर्व कोंबड्या बऱ्याही झाल्या हा आश्चर्यजनक प्रकार घडल्यामुळे लुई पाश्चर्यांना सुद्धा खूप आश्चर्य वाटलं त्यांनी हे जंतू इतर अनेक चांगल्या कोंबड्यांना टोचून पाहिले .

लुई पाश्चरचे प्रमुख शोध कोणते आहेत?

 या कोंबड्यांना पुढे हा रोग झाला नाही आणि ज्यांना ही लस टोचली नव्हती त्यांना लगेच  हा रोग झाला म्हणजे त्यातून त्यांना एक गोष्ट समजली की रोगजंतू जुने झाले की दुबळे होतात.  आणि हेच आपल्याला लसीच्या स्वरूपामध्ये जर शरीरात टोचले तर आपल्या शरीराला त्या सूक्ष्म जंतूंशी लढण्याची प्रॅक्टिस करून घेता येते आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी शरीर  समर्थ होतं आणि अशा रोग आणि पासून रोगमुक्त ही होण्यास त्याला मदत मिळते .  लुई पाश्चरने अनेक लसीनचा  शोधही लावला पण त्याचे पेटंट न घेता पैसे न कमवता ते लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी दिल म्हणून त्याला वैज्ञानिक जगतात एक महर्षी  तसेच वैज्ञानिक संत म्हणून ओळखला जातो.


लुई पाश्चर महत्वाचे का आहे?  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.